रोज खाल्ले जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमध्ये असते भरभरून साखर, टाळा!
असे काही पदार्थ असतात जे आपण रोज खातो, पण आपल्याला माहीतच नसतं की यात इतकी साखर असते. आपण ते नकळतपणे खात जातो आणि मग आपल्या शरीरातील साखर वाढतच जाते. एकीकडे आपण असंही म्हणतो की साखर बंद करणार आणि दुसरीकडे आपण हे पदार्थ सर्रास खातो. कोणते आहेत हे पदार्थ बघुयात...
1 / 5
बटाटे आपण रोजच खातो. बटाट्यांशिवाय कुठलीही भाजी, कोणताही पदार्थ अपूर्ण आहे. पण बटाटा खाणं म्हणजे शरीरातील साखर वाढवणं! होय. बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असतात. बटाट्यामध्ये प्रति 20 ग्रॅम सुमारे 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. पण मग बटाटे खाणे पूर्णपणे सोडून द्यावं का? नाही. बटाटे खा पण कमी खा.
2 / 5
काही लोकांना भाताशिवाय जेवणच जात नाही. थोडा का असेना, भात हवाच! पण भात नियमित खाणाऱ्या लोकांना हे माहित आहे काय की शिजवलेल्या भातात भरपूर प्रमाणात साखर असते! एक कप शिजवलेल्या पांढऱ्या तांदळात अंदाजे 53 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.
3 / 5
अर्धा लिटर कोला म्हणजे १७ साखरेचे क्युब्स खाणे! विचार करा जे सॉफ्ट ड्रिंक्स तुम्ही येता-जाता सहज म्हणून पिताय त्यात इतकी साखर आहे. तुम्हाला जर सॉफ्ट ड्रिंक्स प्यायची सवय असेल तर ती आजच सोडा.
4 / 5
पीनट बटर: पीनट बटर अनेक लोकांना आवडतं. जी लोकं व्यायाम करतात, डाएटवर लक्ष ठेऊन असतात त्यांच्या बोलण्यातून तुम्ही अनेकदा ऐकलंही असेल की पीनट बटर खा! पण तुमच्या माहितीसाठी, पीनट बटरमध्ये भरपूर साखर असते. पीनट बटर ऐवजी तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता.
5 / 5
दही: रोज दही खावं असं आरोग्यतज्ञ सांगतात. दह्यामध्ये शरीराला उपयोगी असणारे अनेक घटक असतात. पण काय तुम्हाला माहित आहे की दह्यात साखर असते? आता विचार करा जर तुम्ही इतर घटक वाढवण्यासाठी रोज दही खात असाल तर तुमची रोज साखर सुद्धा किती वाढत असेल? तुम्हाला आश्चर्य वाटेल दह्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स पेक्षा जास्त शुगर असते.