सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून देत नीरज चोप्राने इतिहास रचला. ज्यानंतर त्याच आयुष्यच बदलून गेलं आहे. त्याच्यावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षा होत आहे.
1 / 6
भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. त्याने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवलं. तब्बल 100 वर्षांत एथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक असल्याने नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत.
2 / 6
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये नीरजला एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 25 लाख दिले जातील. तर भारतीय हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली.
3 / 6
बीसीसीआयसोबत इंडियन प्रीमियर लीगमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने (CSK) नीरजला एक कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. सीएसके संघ प्रशासनाने दिलेल्या माहिती त्यांनी म्हटलं, ‘नीरज चोप्राने मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल त्याला एक कोटी रुपये बक्षिस म्हणून चेन्नई सुपरकिंग देणार असून त्याच्यासाठी 8758 नंबरची विशेष जर्सी देखील तयार करणार आहे.’
4 / 6
इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कंपनीने सांगितलं नीरज 7 ऑगस्ट, 2022 पर्यंत आमच्या कंपनीच्या विमानाने हवा तितंका मोफत प्रवास करु शकतो. या सर्वासोबतच गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.
5 / 6
ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला
6 / 6
या सर्वांसह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच त्याला क्लास वन दर्जाची नोकरी आणि पंचकुलामध्ये एथलेटिक्स सेंटर ऑफ एक्सीलेन्सचा अध्यक्ष बनवण्याचंही जाहीर केलं आहे.पंजाब सरकारने देखील नीरजला बक्षीस जाहीर केलं असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.