PHOTOS : ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूची कमाल, एकाच ऑलिम्पकमध्ये सात पदकं खिशात
ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉन (Emma McKeon) हिने टोक्यो ओलिम्पिकमध्ये तब्बल चार गोल्डसह एकूण सात पदक जिंकत धमाका उडवला आहे.
-
-
ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉन (Emma McKeon) हिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) धमाकेदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक-दोन नाही तर सात पदकं जिंकत रेकॉर्ड केला आहे. रविवारी मॅककॉनने महिलांच्या 4×100 मेडले रिलेमध्ये ऑस्ट्रेलिया संघासोबत जिंकत यंदाच चौथं पदक मिळवलं.
-
-
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील 27 वर्षीय एम्मा मॅककॉनने एका ऑलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू बनली आहे. याआधी पुरुष जलतरणरटू माइकल फेल्प्सने अशी अप्रतिम कामगिरी केली आहे.
-
-
महिलांमध्ये मॅककॉनने 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 23.81 सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदक मिळवलं. त्याआधी 100 मीटर फ्रीस्टाइलमध्येही तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. मॅककॉनने चार गुणा 4×100 मेडले रिलेच्या संघातही ती सामिल होती. त्यातही तिने सुवर्णपदक मिळवलं.
-
-
संपूर्ण ऑस्ट्रेलियन महिला संघाने शानदार प्रदर्शन केलं. मॅककॉनने सेशनमध्ये पहिल्या 50-फ्रीस्टाइलमध्ये विजयानंतर रिलेवरही बटरफ्लाय लेग केले. केट कँपबेलने फ्रीस्टाइलवर चांगल प्रदर्शन दाखवलं. संपूर्ण संघाने 3 मिनिटं 51.60 सेकंद ऑलिम्पिक रेकॉर्डला गवासणी घालत चॅम्पियन अमेरिकेला मागे टाकलं.
-
-
याआधी मॅककॉनने तिसरं टोक्यो ओलिम्पिक सुवर्ण पदक 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये जिंकलं होतं. मैककॉनने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर बटरफ्लाई, 4×200 मीटर रिले आणि 4×100 मीटर मिक्स्ड मेडले रिलेमध्ये अप्रतिम कामगिरी करत पदकं खिशात घातली आहेत.