PHOTO : भारतीय महिला बॅडमिंटनपटूंची कमाल, सलग तिसऱ्यांदा मिळवलं ऑलिम्पिक पदक
भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन महिला ऐकेरीत तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात चीनच्या ही बिंगजियाओला नमवत कांस्य पदक पटकावले आहे.
1 / 4
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चीनच्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
2 / 4
यंदा भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या सिंधूने मागच्या वेळी पार पडलेल्या 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिनाकडून पराभव पत्करावा लागल्याने सिंधूचं सुवर्ण पदक हुकलं होतं.
3 / 4
2016 आधी 2012 च्या लंडन ऑलिम्पकमध्येही भारतीय महिला बॅडमिंटनपटूने भारताला ऑलिम्पिक पदक जिंकवून दिलं होत. पण यावेळी सिधू नाही, तर सायना नेहवालने (Saina nehwal) कांस्य पदक मिळवून दिलं होतं.
4 / 4
सिंधू टोक्यो ऑलिम्पकमध्ये सुवर्णपदक जिंकेल असे सर्वांना वाटत होते. कारण तिने सुरुवातीपासूनच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. पण अखेर सेमीफायनलच्या सामन्यात चीनी ताईपेच्या ताई त्जू यिंगने 21-18 आणि 21-12 च्या फरकाने नमवत सिंधूला स्पर्धेबाहेर केलं.