Tokyo Paralympics भारतासाठी आजचा दिवस सुवर्णमय, दोन सुवर्णपदकांसह पाच पदकं खिशात, वाचा कोणी कोणतं पदक जिंकलं
भारतीय खेळाडूंनी सध्या सुरु असलेल्या टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आतापर्यंत सात पदकं मिळवली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांचाही समावेश आहे.
1 / 5
भारतीय खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिक खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आता अशीच कामगिरी भारताचे पॅरा एथलिट्स टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) करत आहेत. आज दिवसभरात भारतीय खेळाडूंनी पाच पदकं खिशात घातली आहेत. यामधील सर्वात पहिलं पदक तेही सुवर्णपदक अवनी लेखरा (Avani Lekhara) हीने निशानेबाजीत मिळवलं. महिलांच्या आर-2 10 मीटर एअर रायफल के क्लास एसएच1 मध्ये सुवर्णपदक मिळवत
अवनीने इतिहास रचला.
2 / 5
यानंतर दिवसाच्या अखेरीस भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं. त्याने 68.55 मीटरचा थ्रो करत हे यश मिळवलं.
3 / 5
भारताने भालाफेक खेळात आणखी एक पदक आज मिळवलं. भारताला दोन वेळा सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया (devendra jhajharia) याने टोक्योमध्ये रौप्य पदकाला गवासणी घातली. देवेंद्रने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत -एफ46 फायनलमध्ये 64.35 मीटरच्या थ्रोच्या जोरावर रौप्य पदक मिळवलं.
4 / 5
भारताने मिळवलेलं दिवसभरातील दुसरं रौप्य पदक योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत मिळवून दिलं. योगेशने F56 प्रकारात 44.38 मीटर दूर थाळी फेकत रौप्य पदक पटकावलं
5 / 5
भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि दोन रौैप्य पदकांसह एक कांस्य पदकही मिळवलं. हे पदकंही भालाफेकमध्येच मिळवलं असून सुंदर सिंह गुजर्रने 64.01 मीटर लांब थ्रो करत कांस्य पदक पटकावलं