टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) चुरशीच्या सामन्यांचे सुरुच आहे. पण या चुरशीच्या सामन्यात अनेक धक्कादायक निर्णयही समोर येत आहेत. याच निर्णयान्वये टेनिस विश्वातील आघाडीच्या दोन महिला टेनिसपटू पराभूत होत स्पर्धेतून बाहेर गेल्या आहेत.
या दोघी खेळाडू म्हणजे जागतिक टेनिस विश्वातील नंबर एकची ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ऍश्ले बार्टी (ashleigh barty) आणि नंबर दोनची जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) आहे.
सर्वात आधाी 25 जुलैला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टीला पहिल्याच राउंडमध्ये स्पेनच्या टॉर्मो हिने 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केलं. ज्यामुळे बार्टीची ऑलिम्पिक वारी पहिल्याच सामन्यानंतर संपुष्टात आली.
त्यानंतर आज (27 जुलै) झालेल्या सामन्याच जपानची टेनिसस्टार नाओमी ओसाका तिसऱ्या राउंडमध्ये पराभूत झाली. जगातीस नंबर दोनची खेळाडू असणाऱ्या नाओमीला जागतिक क्रमवारीत 42 व्या क्रमांकावर असणाऱ्या चेक रिपब्लीकच्या मार्केटाने 6-1,6-4 च्या फरकाने मात दिली. हा सामना 67 मिनिटं चालला.
नाओमीच्या पराभवामुले यजमान संघ जपानला मोठा धक्का बसला आहे. कारण नाओमी ही जपानसाठी पदक मिळवून देणारी सर्वात विश्वासू खेळाडू होती. जपानला तिच्याकडून सर्वाधिक आशा होत्या.