Tokyo Olympics Hockey Bronze | पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, जर्मनीला हरवून कांस्यपदकाची कमाई
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीमुळे तमाम भारतवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. जर्मनी संघाला 5-4 ने हरवत टीम इंडियाने ऑलिम्पिक्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
1 / 6
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे. जर्मनीवर मात करत भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.
2 / 6
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीमुळे तमाम भारतवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. जर्मनी संघाला 5-4 ने हरवत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली.
3 / 6
भारतीय संघाच्या विजयाने हॉकीमधील तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला आहे. भारताने हॉकीमधील शेवटचं पदक 1980 साली जिंकलं होतं. त्यानंतर चार दशकांनी भारताला कांस्य पदक पटकावण्यात यश आलं आहे.
4 / 6
टीम इंडियाचं सुरुवातीपासून जर्मनीवर वर्चस्व पाहायला मिळालं. भारताने 5-3 अशी आघाडी घेतली होती. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. तर 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले.
5 / 6
दुसरीकडे, चौथ्या क्वार्टरची जर्मनीने शानदार सुरुवात केली होती. 48 व्या मिनिटाला जर्मनीने चौथा गोल केला. या गोलमुळे भारताची आघाडी कमी झाली होती. मात्र अखेर जर्मनी संघाला 5-4 ने हरवत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली.
6 / 6
हॉकीपटू गुरजंत सिंह यांच्या कुटुंबीयांनी हॉकीत कांस्य पदकानंतर जल्लोष केला