Dental Care | दातदुखी वर सोपे आणि उत्तम घरगुती उपाय!

| Updated on: Oct 12, 2023 | 4:13 PM

रात्री अपरात्री दात दुखायला लागतात. जवळपास जर डॉक्टर नसेल तर आपल्याला प्रश्न पडतो की यावर काय उपाय करायचा. दातांचं दुखणं हे सगळ्यात अवघड दुखणं असतं. हे दुखणं दूर करताना माणूस वैतागून जातो. हे काही घरगुती उपाय आहेत जे दाताच्या दुखण्यावर उत्तम उपाय आहेत. बघुयात काय आहेत हे उपाय...

1 / 5
लवंग दातात ठेवलं की दातांचं दुखणं दूर होतं. तुम्ही लवंगाची पावडर आणि मीठ मिसळू शकता. नुसतं लवंग किंवा लवंगाची पावडर आणि मीठ यापैकी काहीही दातांना लावल्यास तुम्हाला फरक जाणवेल. रात्री लावून ठेवा, सकाळी तुम्हाला फरक जाणवेल.

2 / 5
एक छोटं भांडं घ्या या भांड्यात एक चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ घ्या आणि त्यात पाणी टाका. हे सगळं मिक्स करून याची एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट दातांवर चोळा. दातांना होणाऱ्या वेदना दूर होतील.

3 / 5
कडुनिंबाच्या पानांचा रस हा दातांवर उत्तम उपाय आहे. कडुनिंबामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. रात्री अचानक दात दुखायला लागल्यास ही पेस्ट घरात ठेवा.

4 / 5
केस गळत असतील तर त्यावर कांदा हा उत्तम उपाय आहे. कांदा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. पण कांदा कापून दातात ठेवल्यास त्याने दातांना आराम मिळतो. हा एक असा घरगुती उपाय आहे जो खूप सोपा उपाय आहे.

5 / 5
एक ग्लास पाणी उकळून कोमट करा. या पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. दातदुखीपासून लवकरात लवकर आराम हवा असेल तर लिंबू पाणी हा उत्तम उपाय आहे. फक्त हे पाणी कोमट असावं. लक्षात ठेवा हे पाणी तुम्हाला प्यायचं नाही त्याच्या गुळण्या करायच्या आहेत.