या 5 SUV ची ऑगस्ट महिन्यात होती सर्वाधिक डिमांड, पहिला नंबर कोणाचा ?
Best Selling SUV : नवीन SUV विकत घेण्याआधी मागच्या महिन्यात कुठल्या SUV ला जास्त मागणी होती, ते चेक करु शकता. आम्ही बोलतोय ऑगस्ट 2024 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या 5 SUV बद्दल.
1 / 5
मारुति सुजुकीने ऑगस्ट 2024 मध्ये ब्रेजाच्या 19,190 यूनिट्सची विक्री केली. कंपनीने मागच्यावर्षी याच महिन्यात ब्रेजाच्या 14,572 मॉडल्सची विक्री केलेली. SUV च्या सेल मध्ये 32 टक्के वाढ झाली आहे.
2 / 5
ऑगस्ट 2024 मध्ये हुंडई क्रेटाच्या 16,762 यूनिट्सची विक्री झाली. या गाडीच्या विक्रीत प्रतिवर्षी 21 टक्के वाढ झालीय. फेसलिफ्ट मॉडलने क्रेटाची विक्री वाढवली आहे.
3 / 5
सेलच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर टाटा पंच आहे. ऑगस्ट महिन्यात 15,643 यूनिट्सची विक्री झाली. SUV चा सेल वर्षाला 8 टक्क्याने वाढला आहे. ही कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
4 / 5
चौथ्या नंबरवर महिंद्रा स्कॉर्पियो आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात 13,787 यूनिट्सची विक्री झाली. मागच्या काही महिन्यात स्कॉर्पियोचा सेल वाढत आहे.
5 / 5
मारुती सुजुकी फ्रोंक्स सेलमध्ये पाचव्या नंबरवर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 12,387 यूनिट्सची विक्री झाली.