Travel Ideas: कॅम्पिंगचे नियोजन करत आहात?, ‘ या’ महत्त्वपूर्ण गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका

| Updated on: Jan 24, 2022 | 6:45 AM

अनेकांना कॅम्पिंगची आवड असते. पर्वतरांगांचा प्रवास त्यांना आवडतो, जंगलात फिरायला देखील आवडते. ज्यांनी यापूर्वी अनेकदा कॅम्पिंग केली आहे. त्यांना सोबत कोणत्या गोष्टी ठेवाव्यात कोणत्या टाळाव्यात याचा अनुभव असतो. मात्र जो व्यक्ती प्रथमच कॅम्पला जाणार आहेत, त्याने काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
तंबू : सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅम्पला जाताना तुमचा तंबू मजबूत असला पाहिजे. तो कॅम्पदरम्यान  तुमच्या सुरक्षेचा महत्त्वाचा पिलर आहे. त्यामुळे तंबूच्या कापडाची निवड करताना ते मजबूत आहे का याची खात्री करा. तंबू बाबत कोणतीही रिस्क घेऊ नका.

2 / 5
स्लिपिंग बॅग : कॅम्पला जाताना तुमच्या सोबत स्लिपिंग बँग देखील ठेवा. ही बॅग वजनाने हलकी असते. ही बॅग सोबत ठेवण्याचा एक मुख्य फयदा म्हणजे तुम्हाला रात्रीच्या वेळी चांगली झोप येईल.

3 / 5
अन्न-पदार्थ :  डोंगराळ भागात गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर अनेकदा खाण्यापिण्याची टंचाई भासते. कॅम्पिंगला जाण्यापूर्वी, आपल्यासोबत पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करा व त्यानंतरच घराच्या बाहेर पडा. तुम्हाला कॅम्पिंगची खूप जास्त आवड आहे आणि तुम्ही वारंवार जर कॅम्पला जात असाल तर स्वयंपाकाचे साहित्य जसे की, एखादा स्टो व इतर कोरडे पदार्थ देखील नेहमी तुम्ही तुमच्या सोबत ठेऊ शकता.

4 / 5
टॉर्च आणि लाइटर : कॅम्पिंग करताना आपल्यासोबत टॉर्च किंवा लाइटर असणे खूप महत्वाचे आहे, कारण कधीकधी या गोष्टी खूप उपयुक्त असतात. ते वजनाने हलके असतात. त्यामुळे त्यांना सोबत ठेवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच प्रवासादरम्यान त्याची तुम्हाला मदत होऊ शकते.

5 / 5
 प्रथमोपचार पेटी : कॅम्पिंग करताना प्रथमोपचार पेटी सोबत असणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जर तुम्हाला दुखापत झाली तर  ही प्रथमोपचार पेटी तुमच्या उपयोगी पडू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने एक प्रथमोचार पेटी तयार करा व ती नेहमी तुमच्यासोबत ठेवा.