मसुरी : दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपास राहणारे लोक कमी बजेटमध्ये मसुरीची ट्रीप करू शकतात. दिल्लीहुन मसुरीला जाण्यासाठी अवघ्या एक हजाराच्या आसपास भाडे लागते. तसेच सातशे ते आठशे रुपयांमध्ये इथे राहण्याची तुमची उत्तम व्यवस्था होते.
ऋषिकेश : ऋषिकेश हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ मानले जाते, विशेष म्हणजे इथे राहण्याची व्यवस्था देखील अतिशय कमी बजेटमध्ये होते. ऋषिकेशमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतात.
शिमला : शिमला हे भारतामधील टॉप पर्यटन स्थळांपैकी एक आहे. विशेष: वर्षभर इथे हनीमून टूरिस्टची गर्दी असते. मात्र तुम्ही देखील शिमल्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ऑफ सिझनमध्ये शिमल्याला गेल्यास तुम्हाला स्वस्त दरामध्ये इथे राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते. तुम्ही पाच हजार रुपयांमध्ये तुमची ट्रीप पूर्ण करू शकता.
वाराणसी : वाराणसी हे एक धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी लाखो लोक वाराणसीला भेट देण्यासाठी येत असतात. हे शहर देखील स्वस्त आहे. तुम्हाला इथे राहण्यासाठी धर्मशाळा किंवा मठाची व्यवस्था होऊ शकेल. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल.
आग्रा : आग्रा हे शहर ताजमहालासाठी ओळखले जाते. ताजमहालाचा समावेश हा जगातील सात आश्चर्यांमध्ये होतो. दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होते. दिल्ली परिसरातील पर्यटक एक ते दोन दिवसांच्या आग्रा ट्रिपचे नियोजन करू शकतात.