Pune Accident Photo | पुणे नवले ब्रिजवर अपघात, ट्रकची कार अन् दुचाकीला जोरदार धडक

| Updated on: Oct 14, 2023 | 12:58 PM

Pune Accident News | पुणे शहरात सहा ऑक्टोंबर रोजी संतोष माने अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्या घटनेस आठवडा उलटत नाही, तोच पुणे शहरात पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन वाहनांचे प्रचंड नुकसान...

1 / 5
पुणे शहरातील नागरिकांना सहा ऑक्टोबर रोजी 2012 मध्ये अपघाताची आठवण झाली. 2012 मध्ये झालेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण या दिवशी आली. मद्यधुंद वाहन चालक उमेश हनुमंत वाघमारे याने  एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.

2 / 5
आठवडापूर्वी झालेल्या त्या अपघातानंतर शनिवारी पुणे येथील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात झाला. शनिवारी सिमेंटने भरलेल्या ट्रकने कार आणि दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकासह दुचाकी चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

3 / 5
ट्रकने दिलेल्या धडकेच्या अपघातामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. पण वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रेक फेलमुळे ट्रक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला.

4 / 5
ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातानंतर नवले ब्रिज परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.

5 / 5
अपघातात जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात करण्यात आले आहे. ट्रेनने ट्रक हटवण्याचे काम  पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे.