'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत.
चारुहास चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्यांच्या शाळेत जातो. तिथे भुवनेश्वरी विद्यामंदीर हा बोर्ड पाहून चारुहास तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्यामंदीर करण्याचा निर्णय घेतो.
पण अक्षरा यावर त्यांना पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण या कृतीने अधिपती चिडणार यावर तिला खात्री आहे. दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते.
मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे, तेव्हा तो प्रचंड चिडतो. चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करु नकोस.
घरात यामुळे पुन्हा दुषित वातावरण होतंय. भुवनेश्वरीला शोधण्याचे अधिपतीचे प्रयत्न पुन्हा जोर धरु लागतात. अधिपती आणि चारुलता मध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होईल का? चारुहास, शाळेचा बोर्ड चारुलताच्या नावावर बदलेल का?