Z-Morh tunnel: धरतीवरील स्वर्गात अत्याधुनिक टनेल, गेम चेंजर ठरणार Z-मोड टनेलची वैशिष्ट्ये
Z-Morh tunnel: जम्मू-काश्मीर म्हणजे धरतीवरील स्वर्ग म्हटले जातो. काश्मीरमधील सोनमर्गचे सौदर्यं पाहण्यासाठी जगभरातून पर्यंटक येत असतात. या ठिकाणी तयार करण्यात आलेला Z-मोड टनेल आता पूर्ण झाला आहे. 6.5 किलोमीटर लांबीच्या या टनेलचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी करणार आहे. या टनेलसाठी 2,700 कोटी रुपये खर्च आला आहे.
1 / 5
गगनगीर आणि सोनमर्गला जोडणारा टनेल 6.5 किलोमीटर लंबीचा आहे. हिवाळ्यात हा मार्ग बर्फवृष्टीमुळे बंद होते. आता तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये दोन लेनचा आहे. यामुळे बारा महिने या भागाशी संपर्क होणार आहे.
2 / 5
बोगदा सुरु झाल्यानंतर या भागात व्यापार 30% वाढणार आहे. त्यामुळे पर्यटन, हॉस्पिटीलिटी, पायाभूत सुविधा आदी उद्योगात रोजगार वाढणार आहे. हिवाळ्यात सोनमर्गचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. बर्फाच्छादित असलेला हा मनाला भुरळ घालते.
3 / 5
बोगद्यामुळे गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. हा बोगदा सामरिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाचा आहे. कारण तो सुरक्षा दलांना एका भागातून दुसऱ्या भागात जाणे सोपे होणार आहे.
4 / 5
समुद्रसपाटीपासून 8,650 फूट उंचीवर हा बोगदा तयार केला आहे. भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका या ठिकाणी असणार नाही. लडाखसारख्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात जाण्यासाठी हा बोगदा उपयोगी ठरणार आहे.
5 / 5
सोनमर्ग बोगदा प्रकल्पामुळे श्रीनगर व्हॅली आणि लडाखमधील अंतर 49 किलोमीटरवरून 43 किलोमीटरवर कमी होईल. यासह महामार्गावर वाहनांचा वेग 30 किमी/तास वरून 70 किमी/तास होईल. जोंजिला बोगदा 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.