Marathi News Photo gallery Tv actress eva grover regretted doing interfaith marriage with aamir khan step brother hyder ali khan
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न करून अभिनेत्रीला पश्चात्ताप; 5 वर्षांत घटस्फोट, मुलीपासूनही दुरावली
ईवा पुढे म्हणाली, "मला पैसा आणि प्रसिद्धी खूप मिळाली. पण जे लग्नाचं आणि बाळाचं स्वप्न मी पाहिलं होतं, ते अपूर्णच राहिलं." हैदर अली हा आमिर खानचा सावत्र भाऊ आहे. आमिरचे वडील ताहिर हुसैन यांनी शहनाज यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.
1 / 6
ईवा ग्रोवर ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'कुमकुम', 'बडे अच्छे लगते हैं', 'करिश्मा का करिश्मा' आणि 'टशन ए इश्क' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. मालिकांमध्ये काम करण्याआधी ती चित्रपटांमध्येही झळकली होती.
2 / 6
ईवा तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होती. तिने आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानशी लग्न केलं होतं. ईवा आणि हैदरचं लव्ह मॅरेज होतं, पण लग्नाच्या पच वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
3 / 6
घटस्फोटानंतर ईवा नैराश्यात गेली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर ती तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 'कॉफी अनफिल्टर्ड'ला दिलेल्या मुलाखतीत ईवाने सांगितलं की, वयाच्या 18 व्या वर्षी तिने पळून लग्न केलं होतं.
4 / 6
"आम्हा दोघांचा धर्म वेगळा होता, म्हणून माझ्या आईचा या लग्नाला विरोध होता. म्हणून मी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार दिवसांतच मला याची जाणीव झाली होती की मी हे लग्न करायला पाहिजे नव्हतं", असं ईवा म्हणाली.
5 / 6
"मी माझं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मी गरोदर राहिले आणि मुलीला जन्म दिला. बाळ आल्यानंतर आमचं नातं सुधारेल अशी मला अपेक्षा होती. पण असं काहीच झालं नाही. आमचं लग्न फक्त पाच वर्षेच टिकलं. त्यावेळी माझी मुलगी तीन वर्षांची होती", असं ती पुढे म्हणाली.
6 / 6
एके दिवशी मी शूटवरून घरी परतले. आईला माझ्या मुलीविषयी विचारलं तेव्हा तिने सांगितलं, "मी तिला त्या लोकांकडे सोपवलं. ती त्यांच्यासाठी दुआं म्हणत होती. उद्या माहित नाही काय होईल?" मी तिला 10 वर्षांपर्यंत भेटली नाही. ती आता तिच्या आत्यासोबत राहते. तिने माझ्यासोबत येण्यास नकार दिला. त्यावेळी मी नैराश्यात गेले होते, असा खुलासा ईवाने केला.