‘सविता भाभी’ला शेजाऱ्यांचा प्रचंड त्रास… म्हणाली, मला या लेव्हलला..
नुकताच एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना थेट अभिनेत्री दिसलीये. रोजलिनने एका व्हिडीओ इंटरव्ह्यूमध्ये तिला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. ज्या सोसायटीत राहते, तिथे दोन ग्रुप आहेत. दोन्ही ग्रुपला वाटतंय तिने त्यांच्या गटात सहभागी व्हावं.
1 / 5
'सविता भाभी'चे पात्र साकारणारी अभिनेत्री रोजलिन खान हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केली. मात्र, तिच्या खासगी आयुष्यात दुखाचा डोंगर बघायला मिळाला.
2 / 5
नुकताच अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. मुलाखतीमध्ये रोजलिन खान ही म्हणाली की, माझ्या सोसायटीमध्ये दोन ग्रुप आहेत त्यांना वाटत होते की, मी दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये जॉईन व्हायला पाहिजे. पण मी तसे केले नाही. त्यामुळे मला प्रचंड त्रास सुरू झाला. मला वाटलं नव्हतं सोसायटीतील लोक या लेव्हलला जातील.
3 / 5
आधीच माझं आजारपण त्यात सोसायटीतील लोकांचा त्रास सुरू झाला. भयंकर त्रास देत होते. मला त्यामुळे अधिकच त्रास होत होता.
4 / 5
मी न्यूट्रल होते. सोसायटीत फंडाची थोडी अडचण झाली होती. त्यामुळे नोटीस बजवावी लागली. त्यानंतर लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी कॅन्सरचा सामना करत होते. माझे केस मोठ्या प्रमाणात गळत होते. मी दुसऱ्या मजल्यावर राहते. तिथली लिफ्ट या लोकांनी रोखली. मी अनेकदा सांगितलं. पण कोणीच मदत केली नाही.
5 / 5
अनेक महिने हे लोक मला असाच त्रास देत राहिले. सोसायटीतील लोक अशा गोष्टी वारंवार करतच असतात. त्यामुळे मला वेदना होतात. मला प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. माझ्या जागी कोणी असती तर फ्लॅट सोडून पळाली असती. पण मी तसं केलं नाही. मी सर्वांशी लढत राहिले. आणि लढत राहणार. मी हारणारी नाही, असं रोजलिनने ठणकावून सांगितलं.