बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमरे, फोटोमधून पाहा कसा सुरु आहे शोध

| Updated on: Jul 10, 2023 | 10:18 AM

चिपळूणमध्ये शिरगाव नदीवर डोहात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांपैकी एकाच मृतदेह मिळाला आहे. दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू एका जागेवरती पाणी 30 ते 35 फूट खोल असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत आहे.

1 / 6
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाले आहेत. वशिष्ठी नदीतील कुंभार्ली स्मशानभूमी जवळ असलेल्या वझर या ठिकाणी आठ मुले पोहण्यासाठी गेली होती.

2 / 6
दहावीतील असलेली ही मुले पोहण्यासाठी आली होती. त्याली आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली. त्यांच्या शोधासाठी रविवारीच शोध मोहीम सुरु केली होती. रात्री हे काम थांबवण्यात आले.

3 / 6
रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन मुले सापडली नाहीत. त्यानंतर सोमवारी एनडीआरएफची टीम बोलबण्यात आली. या टीमने शोध मोहीम सुरु केली आहे.

4 / 6
शिरगाव पोहण्यासाठी गेलेली ही मुले पावसाची एक मोठी सर आली. त्यामुळे सहा जण एका झोपडीत आसरा घेण्यासाठी गेले. परंतु आतिक बेबल अन् अब्दुल कादिर लसने यांनी पोहण्यासाठी उडी मारली. डोहात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. परंतु दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढताना अडचणी येत आहे.

5 / 6
दोन्ही मुलांनी पोहण्यासाठी उडी मारलेला डोह हा ३० ते ४० फूट खोल आहे. या डोहात ही मुले बुडाली.  पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली आहे.

6 / 6
मुलांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने पाण्यात कॅमरे सोडले. त्यामाध्यमातून मुलांचे मृतदेह शोधले जात आहे. एका जणाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध अजूनही सुरु आहे.