सौरउर्जेवर चालणारा ब्लुटूथ स्पीकर पाहिलात का?
Ubon Speaker | उबॉन एसपी 40 स्पीकरची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. Amazon किंवा फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर या ब्लुटूथ स्पीकरची विक्री केली जात आहे.
-
-
उबॉन या भारतीय कंपनीने सौरउर्जेवर चालणारा ब्लुटूथ स्पीकर लाँच केला आहे. उबॉन एसपी 40 हा स्पीकर विजेविना चालतो. सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर हा स्पीकर चार्ज होतो.
-
-
उबॉन एसपी 40 स्पीकर सिंगल चार्जमध्ये चार तास काम करतो. या स्पीकरवर सोलर पॅनल बसवलेले आहे. त्यामुळे वीज नसल्यास फक्त सूर्यप्रकाशात ठेवल्यासही स्पीकर चार्ज होईल.
-
-
या स्पीकरमध्ये ड्यूएल टॉर्च आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी 1200 एमएचची जबरदस्त बॅटरी आहे.
-
-
उबॉन एसपी 40 स्पीकरची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. Amazon किंवा फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर या ब्लुटूथ स्पीकरची विक्री केली जात आहे.
-
-
उबॉन एसपी 40 स्पीकरमध्ये एफएम रेडिओचाही ऑप्शन आहे. या स्पीकरची रेंज 10 मीटर इतकी आहे. याशिवाय, स्पीकर, युएसबी पोर्ट, मायक्रो टीएफ, एसडी कार्ड पावर्ड टू वायरलेस स्पीकर असे कनेक्टिव्हिटी ऑप्शनही देण्यात आले आहेत.