Photos : पर्यावरणाचं संवर्धन आणि स्वप्नातील महाल एका निर्णयातून साकार, पाहा ‘ट्री हाऊस’चे फोटो…
'ट्री हाऊस' असं या झाडाला म्हटलं जातंय. हे घर फुल फर्निश्ड आहे. या घरात सर्व सोई-सुविधा आहेत. हे घर बांधण्यासाठी पर्यावरणप्रेमी अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी झाडाची एक फांदीही तोडली नाही.
1 / 5
सध्या हे घर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र बनलंय. शाही राजवाडे, सुंदर मंदिरं आणि उद्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमध्ये हे अनोखं घर बांधण्यात आलं आहे. कुल प्रदीप सिंह नावाच्या आयआयटी इंजिनियरने 2000 मध्ये हे अनोखं घर बांधलं आहे. हे घर बांधताना त्यांनी 80 वर्षे जुनं आंब्याचं झाड जपलं आहे. त्याला न तोडता हे घर बांधलंय.
2 / 5
'ट्री हाऊस' असं या झाडाला म्हटलं जातंय. हे घर फुल फर्निश्ड आहे. या घरात सर्व सोई-सुविधा आहेत. हे घर बांधण्यासाठी पर्यावरणप्रेमी अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी झाडाची एक फांदीही तोडली नाही
3 / 5
केपी सिंह यांनी आपल्या स्वप्नातील हे घर पर्यावरणाचं संवर्धन करत बांधलं आहे. हे घर जमिनीपासून 9 फूट उंचीवर आहे. या घराची उंची 40 फूट आहे. या घरात खास प्रकारच्या पायऱ्या बनवण्यात आली आहेत.
4 / 5
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 4 मजली घर बांधण्यासाठी जराही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. स्टील, सेल्युलर आणि फायबर शीट वापरून हे घर बांधण्यात आलं आहे.
5 / 5
केपी सिंह यांनी त्यांच्या या घराची रचना झाडाच्या फांद्यांनुसार केली आहे. त्यानी सोफा स्टँड म्हणून झाडाची फांदी डहाळी आणि टीव्ही स्टँड म्हणूनही फांदीचाच वापर केला आहे. या घरात स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, डायनिंग हॉल आणि लायब्ररीसह सर्व सुविधा आहेत.