Marathi News Photo gallery Uddhav Thackeray Resignation Uddhav Thackeray hands over resignation to Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan
Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरे अखेर मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार, राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केलाय.
1 / 6
एकनाथ शिंदे यांची बंडाळी, त्यांना मिळालेली तब्बल 50 पेक्षा अधिक आमदारांची साथ, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला विरोधातील निकाल, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
2 / 6
गुरुवारी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यापूर्वीच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तसंच महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यानंतर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
3 / 6
मुख्यमंत्रीपदासोबतच उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुनच आपण विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधान परिषदेतही दिसणार नाही. ते आता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचं काम करतील.
4 / 6
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे रात्री साडे अकराच्या सुमारास राजभवनावर पोहोचले. तिथे त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
5 / 6
उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नीलम गोऱ्हे, अनिल परब, भास्कर जाधव, यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार आणि नेते उपस्थित होते.
6 / 6
राजीनामा देण्यापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला होता. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देऊनही 12 आमदारांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. तोच मुद्दा उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या भेटीत मांडला आणि त्यावरुन हास्यविनोद झाल्याचंही बोललं जात आहे.