Marathi News Photo gallery Union cabinet meeting increases msp for rabi crops for marketing season 2022 23 decision taken in Modi Cabinet check details here
शेतकऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारकडून रब्बी हंगामाची MSP जाहीर, ‘इथे’ पाहा संपूर्ण यादी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले. यानुसार गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपयांनी, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 आणि मोहरीच्या 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकार 23 पिकांची एमएसपी जाहीर करते.
1 / 6
केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 2022-23 च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले. यानुसार गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपयांनी, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 आणि मोहरीच्या 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकार 23 पिकांची एमएसपी जाहीर करते.
2 / 6
केंद्र सरकारच्या वतीनं उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. एका क्विंटलला 290 रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे 5 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय 5 लाख कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होईल.
3 / 6
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी गव्हाच्या आधारभूत किमतीत 40 रुपयांनी, बार्लीच्या किमंत 35 रुपयांनी, हरभऱ्याने 130 रुपयांनी, मसूर आणि मोहरीने 400 रुपयांनी आणि सूर्यफूलच्या किमतीत 114 रुपयांनी वाढ केली आहे.
4 / 6
केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याची घोषणा अशा वेळी केलीय जेव्हा देशातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनानं जोर पकडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
5 / 6
संग्रहित छायाचित्र.
6 / 6