केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबळ्या वाघ

| Updated on: Jul 10, 2024 | 9:01 PM

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिबळ्या वाघ पुन्हा एकदा दत्तक घेतला आहे. एका वर्षाचा १ लाख २० हजार इतका खर्च ते करत असतात. रामदास आठवले यांनी प्राणीमात्रांवर प्रेम करा असा संदेश देखील यावेळी दिला आहे.

1 / 6
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजनेतून बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेतलाय.

2 / 6
मागील 6 वर्षांपासून रामदास आठवले आणि त्यांचा सुपुत्र जित आठवले हे बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेत आहेत. बिबळ्या वाघ दत्तक घेण्यासाठी वर्षभरासाठी 1लाख 20 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च दरवर्षी रामदास आठवले हे वनविभागाला सुपूर्द करत असतात.

3 / 6
रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या बिबळ्या वाघ पँथरचे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे. रामदास आठवलेंनी सींबा थांब अशी हाक देताच पँथर सिम्बा थांबला. हे पाहून उपस्थितांना ही आश्चर्य वाटले.

4 / 6
रामदास आठवले यांन दलित पँथर चळवळीतून आपली राजकीय प्रवास सुरु केला. प्राणीमात्रांवर प्रेम करा, प्राण्यांचे रक्षण करा, निसर्गावर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी आपण दरवर्षी पँथर दत्तक घेत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

5 / 6
ते म्हणाले की, मी पँथर चळवळीतून पुढे आलो आहे त्यामुळे मला पँथर बद्दल प्रेम आहे. पँथर स्वतः होऊन कुणावर हल्ला करीत नाही. पण कोणी हल्ला केला तर सोडत नाही. थेट नरडीचा घोट घेतो.

6 / 6
रामदार आठवले यांनी आज जेव्हा हा पँथर दत्तक घेतला तेव्हा त्यांच्यासोबत वनविभागाचे वन संचालक एस. मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सीमाताई आठवले आणि रामदास आठवले यांचे बंधू संतोष आठवले तसेच सर्व आठवले कुटुंबीय उपस्थित होते.