मलायकाच्या आई जॉयस यांचं पहिलं लग्न अनिल अरोरा यांच्यासोबत झालं. त्यानंतर अनिल कुलदीप मेहता यांच्यासोबत. जॉयस यांचं दोघांसोबत घटस्फोट झाला.
मलायका जेव्हा फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा जॉयस आणि अनिल अरोरा यांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा मलायकाची लहान बहीण फक्त 6 वर्षांची होती.
रिपोर्टनुसार, मलायका, अमृता यांच्या खऱ्या वडिलांचं नाव अनिल अरोरा असं असून सावत्र वडिलांचं नाव अनिल मेहता असं आहे. अनिल मेहता यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.
मलायकाची आई जॉयस इन्स्टाग्रामवर कुकिंग व्हिडीओ पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 40 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
मलायकाच्या बहिणीबद्दल सांगायचं झालं तर, 2009 मध्ये अमृता अरोरा हिने शकील लदाक याच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत.