UPSC Success Story: प्रेमसुख डेलू यांनी आयपीएस बनण्याआधी 12 परीक्षाना केले होते क्रॅक , संघर्षाची अशी कहाणी की प्रत्येक जण होईल प्रेरीत!
UPSC Success Story: कॉलेजमध्ये लेक्चरर पदावर कार्य करत असताना प्रेमसुख यांनी वर्ष 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेत ऑल इंडियात 170वा क्रमांक आला यासोबतच त्यांनी आयपीएसची पोस्ट सुद्धा पटकावली.
1 / 7
यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्ष घालवावे लागतात. प्रेमसुख डेलू (IPS Officer Premsukh Delu) यांचे नाव अशा विद्यार्थ्यांमध्ये घेतली जाते ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा झेंडा अटकेपार लावलेला आहे व त्याची कहाणी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी आहे. प्रेम सुख यांनी एक किंवा दोन नाही तर एकंदरीत 12 सरकारी (government job) नोकरी त्यांना लागल्या होत्या, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या यशाबद्दल..
2 / 7
राजस्थान मधील बीकानेर जिल्ह्याच्या नोखा तहसील येथील गाव रासीसरच्या डेलू कुटुंबात 3 अप्रेल 1988 रोजी मेधावी प्रतिभा यांचा जन्म झाला.त्यांचे वडील शेतकरी आहे.4 भावंडांमध्ये प्रेमसुख सर्वात लहान आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच बिकट होती त्यांचे वडील उंट गाडी चालवून लोकांचे सामान एका जागेवरून दुसर्या जागेवर नेण्याचे काम करत असे.
3 / 7
प्रेमसुख डेलू यांनी 10वी पर्यंत चे शिक्षण आपल्या गावातील सरकारी शाळेत पूर्ण केले त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी बिकानेरच्या राजकीय डूंगर कॉलेज येथून पुढील शिक्षण पूर्ण केले येथून त्यांनी इतिहासामध्ये एम ए केले आणि गोल्ड मेडलिस्ट म्हणून कॉलेजमध्ये नावलौकिक कमावला यासोबतच त्यांनी इतिहास विषयांमध्ये यूजीसी नेट आणि जेआरएफची परीक्षा सुद्धा क्लिअर केली.
4 / 7
प्रेम यांना लहानपणापासूनच सरकारी ऑफिसर बनायचे होते आणि आपल्या कुटुंबाला गरिबी परिस्थितीतून बाहेर काढायचे होते याबद्दल ते नेहमी विचार करायचे म्हणून त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासाकडे आणि शिक्षणाकडे राहिले. प्रेमसुख यांनी वर्ष 2010 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा तयारी करण्यास घेतली त्यानंतर त्यांनी पटवारीच्या भरतीसाठी अर्ज सुद्धा केला आणि त्यामध्ये यश सुद्धा प्राप्त झाले.
5 / 7
शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रेमसुख डे यांनी राजस्थान येथे ग्रामसेवक पदाची परीक्षा दिली ज्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकांचा किताब पटकावला. त्यानंतर असिस्टंट जेलरची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये राजस्थानमधून त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. जेलर अशी पोस्ट जॉईन करण्याआधी सब इन्स्पेक्टर पदाची परीक्षा दिली होती आणि त्याचा निकाल सुद्धा आल्यामुळे त्यात त्यांचे सिलेक्शन झाले.
6 / 7
यानंतर काही काळ त्यांनी कॉलेजमध्ये लेक्चरर पदासाठी अर्ज केला आणि तेथे कार्य देखील केले यादरम्यान त्यांनी सिविल सर्विस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. राजस्थान प्रशासनिक सेवा साठी परीक्षा दिली जेथे त्यांना तहसीलदार पद मिळाले आणि प्रेमसुख यांनी तहसीलदार पदावर पदाचा पदभार स्वीकारून तेथे रुजू झाले तेथूनच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रमाणे तयारी सुद्धा केली.
7 / 7
वर्ष 2014 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा फॉर्म भरल्यानंतर त्यांना यश प्राप्त झाले नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा वर्ष 2015 मध्ये ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली त्यांना ऑल इंडिया मध्ये 170 वा रँक सोबतच आयपीएस पोस्ट सुद्धा मिळाली. प्रेमसुख यांना गुजरात कॅडर मिळाला आणि त्यांची पहिली पोस्टिंग गुजरातच्या अमरेलीमध्ये एसीपी पदावर झाली.