उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलमुळे लोकांच्या निशाण्यावर कायमच असते. आता उर्फी जावेद हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.
उर्फी जावेद हिने एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये ती एका वाईट अनुभवाबद्दल बोलताना दिसली. उर्फी जावेद म्हणाली की, मी पापाराझींना फोटोसाठी पोझ देत होते, त्यावेळी माझे कुटुंबिय देखील उपस्थित होते.
त्यावेळी काही ग्रुपमध्ये लोक येत होते. त्यापैकी एक मुलगा मला म्हणाला की, तू किती लोकांसोबत संबंध निर्माण केले आहेत. तो मुलगा 15 वर्षाचा असेल.
ज्यावेळी तो मला हे बोलत होता, तिथेच बाजूला माझी आई पण होती. मला त्या मुलाच्या आई वडिलांची किव येते. त्या मुलाचे ऐकून मला काहीच सुचत नव्हते.
आता उर्फी जावेद हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.