उर्फी जावेद तिच्या भन्नाट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अतरंगी कपडे परिधान करत ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते. मात्र अनेकदा ती तिच्या कपड्यांमुळे जोरदार ट्रोल होते. उर्फीच्या बाबतीत पुन्हा एकदा असंच घडलंय.
मंगळवारी उर्फी जावेदने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिने हिरव्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तिच्या ड्रेसची स्टाइल पाहून पुन्हा एकदा नेटकरी अवाक् झाले आहेत.
उर्फी नेहमीच प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन करते असा आरोप नेटकरी करतात. प्रकाशझोतात येण्याची एकही संधी ती सोडत नाही, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.
उर्फीचा हा अजब ड्रेस पाहून तिने नेमकं काय घातलंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. काहींना मात्र उर्फीचा हा लूकसुद्धा आवडला आहे.
बॅकलेस ड्रेसचा एक नवीन प्रकार उर्फीने परिधान केल्याचं पहायला मिळालं. उर्फीचे अजब ड्रेस डिझाइन करणारी ही वेगळी टीमच आहे. ही टीम आणि उर्फी मिळून तिचे आगळेवेगळे ड्रेस डिझाइन करतात.