आपल्या चित्रविचित्र फॅशनसाठीप्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . कधी पानांचे , फुलाचे, काचेच्या तुकड्यांचे, सेफ्टी पिनांचे ड्रेस घातलेली दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी आपल्या फँशनसाठी चर्चे आली आहे.
उर्फीने आता चक्क धान्य ठेवल्या जाणाऱ्या पोत्यापासून ड्रेस तयार करून घातला आहे. पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
Bori or a dress ? Whatttttt Made this from a bori in 10 mins असं कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.
उर्फीचा हा व्हिडिओ लुक पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे.
टाकाऊ वस्तूंपासून कपडे बनवण्याच्या प्रयत्ना केल्याबद्दल काही चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या नवीन लूकवर टीका केली आहे.
एकाने लिहिले, "व्वा आता टारझनही झाली तर ," दुसर्याने लिहिले, "क्रिएटीव्हीटी टू नेक्स्ट लेव्हल " अश्या कमेंट केल्या आहेत.