सुंदर त्वचा
सर्व प्रथम 1/4 चमचे दालचिनी पावडर घ्या. त्यात अर्धा चमचा मध घाला. ते मिसळून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा.
मध आणि दालचिनीच्या पेस्टला चेहऱ्याला लावून हलक्या हातानं 2 मिनिटं मालिश करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर एका मिनिटासाठी अशीच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
हे त्वचेवर ग्लो आणण्यात आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वापरू शकता. ते वापरण्यापूर्वी एकदा आपल्या त्वचेवर एक टेस्ट घ्या.