Photo : पुणे शहरात गुन्हेगारांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड, वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत

| Updated on: Jul 17, 2023 | 12:56 PM

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांकडून अनेक उपाययोजना केल्या जात असताना गुन्हेगारी कमी होती नाही. आता पुण्यातील सहकार नगरमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड झाली आहे.

1 / 5
पुणे येथील सहकार नगर आणि भारती विद्यापीठ या दोन्ही भागांमध्ये एकाच दिवशी वाहनांची तोडफोड झाली. वाहनांची तोडफोड करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारांकडून केला जात आहे.

2 / 5
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडीतील ओम साई निवास येथील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दोन चार चाकी, एक रिक्षा, दोन दुचाकी आणि एक टँकर अशा वाहनांचे नुकसान झाले.

3 / 5
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

4 / 5
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन टोळक्याने काही वाहनांची तोडफोड केली. धनकवडी येथील चव्हाण नगर परिसरातील शांतीनगर वसाहतीत दुचाकीवरून आलेल्या टोक यांनी लाकडी दांडक्याने सुमारे पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली.

5 / 5
सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहकार नगरमध्ये यापूर्वी गाड्यांची तोडफोड झाली होती. त्यातील काही आरोपींना पोलिसांना अटकही केली होती. आता पुन्हा तोडफोड झालीय.