Vande Bharat: वंदे भारत स्लीपर कोचमध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा, काय आहेत फिचर्स

| Updated on: Apr 07, 2024 | 3:10 PM

Vande Bharat sleeper train: मेड इन इंडियाच्या धर्तीवर तयार झालेली वंदे भारत ट्रेन अल्पवधीतच लोकांच्या पसंतीला उतरली आहे. देशातील विविध भागात ही ट्रेन सुरु करण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर्षी वंद भारत ट्रेनचे स्लीपर कोच येणार असल्याचे म्हटले आहे.

1 / 5
वंदे भारत

वंदे भारत

2 / 5
वंदे भारत ट्रेननंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन येत आहे. त्यात 16 कोच असणार आहेत. एसी 3 टियरचे 11 कोच, एसी 2 टियरचे 4 कोच, एसी फर्स्टचा एक कोच असणार आहेत. या ट्रेनमधून 823 व्यक्ती प्रवास करु शकणार आहे. त्यात एसी 3 टियरमध्ये 611, एसी 2 टियरमध्ये 188 तर एसी 1st मध्ये 24 जण प्रवास करु शकतील.

3 / 5
वंदे भारत स्लीपर एसी 3 टायर कोचमधील प्रवाशांसाठी चांगली सुविधा भारतीय रेल्वे करत आहे. प्रत्येक बर्थच्या बाजूला पॅड फीचर असणार आहे. तसेच राजधानी एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत बर्थ मॅट्रेस अधिक आरामदायी असणार आहेत.

4 / 5
वंदे भारतमधील स्लीपर इंटीरिअर अधिक चांगले केले गेले आहे. या ट्रेनमध्ये अपर आणि मिडल बर्थपर्यंत जाण्यासाठी जिना (Staircase) अधिक चांगला करण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना अपर आणि मिडल बर्थपर्यंत सहज जाता येणार आहे.

5 / 5
वंदे भारत स्लीपर कोचमधील लाइट सेंसरचे असणार आहे. ट्रेनमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी स्वयंचलित दरवाजे असतील. या ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे बायो-व्हॅक्यूम टॉयलेट बसवण्यात येणार आहे.