बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. आता लवकरच ती प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या गाडीचे कोच आणण्यापूर्वी कठोर चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर दोन महिने रुळावर ही गाडी चालवल्यावर प्रत्यक्षात सुरु होणार आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन ८००-१,२०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी असणार आहे. या ट्रेनमध्ये रात्री १० वाजता प्रवासी बसतील आणि सकाळी आपल्या स्टेशनवर पोहचतील, अशी अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांचा विचार करुन तिचे भाडे राजधानी एक्स्प्रेस इतकेच ठेवणार आहे.
वंदे भारत
वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स दिले आहे. या ट्रेनमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅबिन तयार केली आहे. १६ डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन असणार आहे. तिचा वेग १८० किमीपर्यंत असू शकतो. यामुळे राजधानी एक्स्प्रेसपेक्षा वेगवान प्रवास यातून होणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस ट्रेनपेक्षा चांगली आहे. तसेच शताब्दी एक्सप्रेस पेक्षाही वेगाने धावणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही ट्रेन पटरीवर येऊ शकते. तिची सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहे.