मुख्य प्रवेशद्वार - असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार प्रामुख्याने सजवून स्वच्छ ठेवले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा डबा किंवा चपला असू नये.
वास्तूशास्त्रानुसार, लाफिंग बुद्ध, वेल्थ शिप, जेम्स ट्री यांसारख्या वस्तू घरात ठेवल्याने धन आणि शांती मिळते. ते यश आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले जातात.
समृद्धीसाठी रोपे - वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे लावल्याने सुख-समृद्धी येते. या वनस्पती नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात. त्यामुळे शक्य तितक्या झाडांनी घर सजवा.पण हे करत असताना काटेरी वृक्षाची झाडे टाळा
तुमच्या खिडक्या आणि आरसे स्वच्छ ठेवा आणि सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ द्या. एक गडद खोली तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मकता आणेल. सतत पाणी वाहणे किंवा गळणे हे शुभ मानले जात नाही.
पाकिटात औषधे ठेवू नका - पाकिटात औषधे ठेवल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येईल. त्यामुळे तुम्ही आजारी ही पडू शकता त्यामुळे पाकिटात औषधे ठेवू नका.