Vegetarian Day | प्रोटीन आणि ओमेगा 3 साठी खा हे शाकाहारी पदार्थ, वजन राहील नियंत्रित, त्वचाही दिसेल तरुण!
सोयाबीनमध्ये ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडही आढळतात. प्रथिनेयुक्त आहार घ्यायचा असेल तर सोयाबीनचा आहारात समावेश करा. शाकाहारी लोकं सोयाबीन खाण्यास अधिक प्राधान्य देतात.
1 / 5
अक्रोडमध्ये ओमेगा 3 व्यतिरिक्त प्रथिने देखील असतात. त्याचबरोबर फायबरचे प्रमाणही आढळते, ज्यामुळे चयापचय सुधारते. अक्रोड मेंदूसोबतच हृदयासाठीही फायदेशीर आहे. यासोबतच मधुमेहाचे रुग्ण न घाबरता आहारात अक्रोडचा ही समावेश करू शकतात.
2 / 5
चिया बियाणे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यात मॅग्नेशियमव्यतिरिक्त सेलेनियम, ओमेगा ३ आणि प्रोटीनही आढळतात. चिया बियाणे खाल्ल्यामुळे तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात आणू शकता. या बियांमुळे आणखी अनेक फायदे होऊ शकतात.
3 / 5
सोयाबीनमध्ये ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडही आढळतात. प्रथिनेयुक्त आहार घ्यायचा असेल तर सोयाबीनचा आहारात समावेश करा. शाकाहारी लोकं सोयाबीन खाण्यास अधिक प्राधान्य देतात.
4 / 5
फ्लॅक्स सीड्स मध्ये फायबर, मॅग्नेशियम तसेच ओमेगा -3 फॅटी अॅसिड आढळतात. आहारात या बियांचा समावेश केल्यास आरोग्याला खूप फायदा होतो. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर हा ऑप्शन नक्कीच चांगला आहे.
5 / 5
राजमा मध्ये भरभरून प्रथिने असतात. जी लोकं व्हेजिटेरियन असतात ती लोकं राजमा खाऊन प्रोटीन मिळवू शकतात. राजमा भात खायला सगळ्यांनाच आवडतं. यात प्रथिने तसेच लोह, पोटॅशियम, फोलेट, फायटिक अॅसिड, मॅंगनीज इत्यादी पोषक घटक असतात.