Marathi News Photo gallery Vinesh Phogat net worth was just Rs 5 crore before Paris Olympics her current net worth is this much
विनेश फोगटची ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी फक्त 5 कोटींची संपत्ती; आता इतका वाढला आकडा
पॅरिस ऑलिम्पिकनंतर विनेशच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच विनेशचं भारतात जल्लोषात स्वागत झालं होतं. ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहिल्यानंतर कुस्तीगीर विनेशला जाहिरातींचे बरेच ऑफर्स मिळत आहेत.
1 / 8
पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीतील कामगिरी आणि अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्याने कुस्तीगीर विनेश फोगट तुफान चर्चेत आली. 25 ऑगस्ट 1994 रोजी हरयाणातील चरखी दादरी याठिकाणी कुस्तीच्या घराण्यातच विनेशचा जन्म झाला.
2 / 8
तिचे वडील राजपाल फोगट, चुलत बहिणी गीता आणि बबिता फोगट हे सर्वजण प्रसिद्ध कुस्तीगीर आहेत. ज्यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' हा चित्रपट 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
3 / 8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दमदार कामगिरी केल्यानंतर विनेश अंतिम फेरीपूर्वी काही ग्रॅम वजन अधिक भरल्याने अपात्र ठरली होती. यामुळे असंख्य देशवासियांची नाराजी झाली होती.
4 / 8
मात्र विनेशची कामगिरी पाहता तिचं भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या सर्व घडामोडींनंतर विनेशची आर्थिक स्थिती सध्या चर्चेत आली आहे.
5 / 8
ऑलिम्पिकमधील परफॉर्मन्सनंतर जाहिरातींसाठी विनेशला प्रचंड मागणी होऊ लागली आहे. यादरम्यान तिनेसुद्धा मानधन वाढवल्याचं कळतंय. पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी विनेश एका डीलसाठी 25 लाख रुपयांच्या आसपास मानधन घ्यायची.
6 / 8
आता तिची फी 75 ते 1 कोटी रुपये इतकी वाढली आहे. विनेशच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली आहे. रिपोर्ट्सनुसार विनेशची एकूण संपत्ती 5 कोटी रुपयांच्या घरात होती. मात्र आता 'टाइम्स नाऊ' आणि 'एशियानेट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, तिची संपत्ती 36.5 कोटी रुपये असल्याचं कळतंय.
7 / 8
फक्त जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंट्समधूनच नाही तर क्रीडा मंत्रालयाकडूनही विनेशला वार्षिक पगार मिळतो. विनेशला दरवर्षी जवळपास 6 लाख रुपये पगार मिळतो.
8 / 8
कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स या मॅनेजमेंट कंपनीद्वारे तिच्या जाहिरातींचे डील्स केले जातात. कुस्तीगीर म्हणून विनेशच्या दमदार कामगिरीमुळे तिला बऱ्याच जाहिरातींचे ऑफर्स मिळत आहेत. विनेशच्या कार कलेक्शनमध्ये 35 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर, 28 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा, 1.8 कोटी रुपयांची मर्सिडीज जीएलई यांचा समावेश आहे.