Vinesh Phogat : विनेश कमाईत पॉवरफुल, किती कोटी संपत्तीची मालकीण? कार्स, आलिशान विलाबद्दल जाणून घ्या
Vinesh Phogat disqualified : पॅरिस ऑलिम्पिकमधून आज भारताला खूपच धक्कादायक निराशाजनक बातमी मिळाली. गोल्ड मेडलच्या सामन्याआधी विनेश फोगाट अपात्र ठरली. विनेशने काल शानदार प्रदर्शन करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण जास्त वजनामुळे विनेश आज अपात्र ठरली.
1 / 5
विनेश फोगाट फक्त कुस्तीच्या मैदानातच नाही, तर कमाईच्या मैदानातही पॉवरफुल आहे. विनेश फोगाटकडे किती संपत्ती आहे, जाणून घेऊया. विनेश फोगाटने करियरमध्ये अनेक माइलस्टोन अचीव केले आहेत. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारी ती भारताची पहिली महिला रेसलर आहे.
2 / 5
विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदकं जिंकणारी विनेश फोगाट एकमेव महिला रेसलर आहे. तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया. 29 वर्षाच्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती 36.5 कोटी रुपये आहे. कुस्तीशिवाय ब्रँड एंडोर्समेंट्स आणि मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्सकडूनही तिला सॅलरी मिळते.
3 / 5
मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्सकडून विनेशला 50,000 रुपये वेतन मिळतं. हीच वर्षाची सॅलरी 6 लाख रुपये होते. त्याशिवाय विनेश फोगाट बेसलाइन वेंचुर्स आणि कॉर्नरस्टोन स्पोर्टची ब्रँड एम्बेसिडर सुद्धा आहे.
4 / 5
विनेश फोगाटचा हरियाणामध्ये एका शानदार विला आहे. तिथे ती आपल्या कुटुंबासोबत राहते. त्याशिवाय तिच्याकडे अजूनही संपत्ती आहे. त्या बद्दल पुरेशी माहिती नाहीय.
5 / 5
विनेश फोगाटकडे एकापेक्षाएक भारी कार्स आहेत. तिच्याकडे तीन लक्जरी कार आहेत. यात एक टोयोटा फॉर्चूनर आहे. त्याची किंमत 35 लाख रुपये आहे. टोयोटा इनोवा कार सुद्धा आहे. त्याची किंमत 28 लाख रुपये आहे. त्याशिवाय मर्सिडीज GLE सुद्धा आहे.