गाजर : हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. या रुग्णांनी गाजर शिजवण्याऐवजी कच्चे खावे, असे डॉक्टरांचे मत आहे. उच्च फायबर सामग्रीमुळे, ते रक्तातील साखर हळूहळू सोडते.
वांगी : ही देखील पिष्टमय नसलेली भाजी आहे आणि या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोलेस्टेरॉल नसते. ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. ही भाजी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
भेंडी : भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. फायबरमुळे तुम्ही खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. तसेच शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी देखील भेंडीचा उपयोग होतो. भेंडीमध्ये असे काही घटक असतात की, ते आपल्या शरीरात नैसर्गीकरित्या इन्सुलिन वाढवतात. त्यामुळे तुम्ही मधुमेहापासून दूर राहू शकता.
काकडी : काकडीमध्ये देखील मोठ्याप्रमाणात फायबर असते, तसेच काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते. काकडीमुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर काकडी खाण्याचा सल्ला देतात.