गर्दी नाही, गोंधळ नाही…शांत निसर्ग रम्य वातावरणात या धबधब्याचा घ्या आनंद, मुंबई-पुण्यापासून जवळच

| Updated on: Jul 15, 2024 | 8:37 AM

पावसाळा सुरु झाला की अनेकांची पावले निसर्गाकडे वळतात. हिरवेगार झालेले डोंगर त्यातून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी विकएंडला पर्यटक लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणी धाव घेतात. त्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. परंतु मुंबई, पुणेजवळ त्यासारखे निसर्गरम्य अनेक ठिकाणे आहेत.

1 / 6
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत असतो. यामुळे मुंबईतील अनेकांनी सेंकड होम इगतपुरीत घेतले आहेत. या इगतपुरीमधील अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत.

2 / 6
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सूनाकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. निसर्गाचे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे आहे. उंच कड्यावरून वाहणार धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो.

3 / 6
डोंगर माथ्यावर जास्त वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या अगदी कडेला असल्याने या भागाचे नाव सूना कडा पडले आहे. दोन भागात डोंगर माथ्यावरून हा विशाल धबधबा कोसळतो.

4 / 6
इगतपुरी हा धबधबा मोठा असून पर्यटकांच्या नजरेस पडला नाही. त्यामुळे इथे गर्दी कमी असते. त्यामुळे पर्यटनास जाण्यारां पर्यटकांसाठी हा धबधबा पर्वणी ठरू शकतो. भाम नदीवर असलेल्या या धबधब्यास भावली धबधबाही म्हणतात.

5 / 6
नाशिक ते मुंबई हे राष्ट्रीय महामार्गावर अनुक्रमे 50.2 आणि 120 किलोमीटर भावली धरण आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावरून, भावली धरणापर्यंत जाण्यासाठी तुम्ही कॅब किंवा ऑटो-रिक्षा घेऊ शकता.

6 / 6
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेला अशोका धबधबा प्रसिद्ध आहे. अशोक चित्रपटाचे चित्रिकरण या ठिकाणी झाले होते.  नाशिक आणि मुंबई परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी “अशोका” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.