उत्तर प्रदेशच्या हापूडामध्ये दारात आलेली वरात वधु पक्षाने परत पाठवून दिली. वर पक्ष लग्न मोडू नका म्हणून विनंती करत होता. लग्न का मोडताय? हे कारणही त्यांनी विचारलं.
त्यावेळी वधू पक्षाने त्यांच्यासमोर एका मुलीला उभं केलं. त्या मुलीला पाहून नवरा मुलगा खूप घाबरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
ती मुलगी दुसरी तिसरी कोणा नाही, तर नवरदेवाची गर्लफ्रेंड होती. ती दिल्लीवरुन उत्तर प्रदेश हापूडामध्ये आली होती.
दिल्लीवरुन आलेल्या त्या मुलीने वधूकडच्या मंडळींना सर्व सत्य काय ते सांगितलं. त्यांच्या कुटुंबाला सत्य समजलं. नवरा फसवतोय हे त्यांच्या लक्षात आलं.
हे समजल्यानंतर वधू पक्षाच्या गोटात एकच सन्नाटा पसरला. संध्याकाळी वरात आली, त्यावेळी नवरी नवरदेवाला म्हणाली, 'चल, मी तुझी माझ्या मैत्रिणीबरोबर ओळख करुन देते' गर्लफ्रेंडला समोर पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले.