राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे.
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याची माहिती आहे.
शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल.
या काळात बार, हॉटेल्स, मॉल बंद राहणार आहेत.
रात्री 8 नंतर बार पुर्णत: बंद राहतील
भाजी मंडईसाठीसुद्धा हे नियम लागु असतील.
वर्क फॉर्म होमला प्राधान्य देण्याचं आवाहन, ऑफीस 50 टक्के क्षमतेनं सुरू राहतील.