सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) या आधारकार्ड बनवणाऱ्या संस्थेने लहान मुलांना आधारकार्ड बनवण्याची सुविधा दिली आहे. हे आधारकार्ड सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते. नवजात मुलांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड बनवणे शक्य आहे.
बाल आधार बनवण्यासाठी नियम थोडे वेगळे आहेत. सध्या अनेक शाळांमध्ये प्रवेश घेतानाही मुलांना आधारकार्डची आवश्यक भासते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचे नियम काय? याची माहिती समोर आली आहे.
लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचे नियम हे सर्वसामन्यांपेक्षा वेगळे असतात. लहान मुलांच्या आधार नोंदणीदरम्यान बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. त्याऐवजी त्यांच्या आई-वडिलांची माहिती आणि फोटोच्या आधारे लहान मुलांचे आधारकार्ड तयार केले जाते.
5 वर्षाखालील कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स आणि डोळ्यांचे Pupil विकसित झालेले नसतात. मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स तपशील घेतले जातात. बालकांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी त्यासाठी पूर्वी आई-वडिलांचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे.
जर मुलांच्या नोंदणीच्या वेळी पालकांनी नोंदणी केली नसेल तर मुलांचे आधार कार्ड बनवता येत नाही. त्यामुळे मुलांच्या आधारसाठी पालकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.