मिठाच्या अतिसेवनाने काय होतं? कोणता आजार होतो? वाचा
मीठ प्रमाणात खावं. पण मिठाचं सेवन अति झाल्यास त्याचे आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात. मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम जास्त होते. सोडियम जास्त झालं की आरोग्य बिघडतं. एक नाही अनेक समस्या निर्माण होतात. जाणून घेऊयात मीठ जास्त खाल्लं की नेमकं काय होतं?
1 / 5
जास्त मीठ खाऊ नये असं नेहमी सांगितलं जातं. मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक असतं. मिठात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. अति सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
2 / 5
मूत्रपिंडाचे आजार खूप त्रासदायक असतात. अर्थात कुठलाही आजार तितकाच त्रासदायक असतो पण मिठाचे अतिसेवन केल्याने मूत्रपिंडाचे आजार होतात. मूत्रपिंडाच्या कार्यात समस्या उद्भवतात.
3 / 5
मधुमेह असणाऱ्यांनी मिठाचं जास्त सेवन करू नये. इतकंच काय तर ज्यांना मधुमेह नाही त्यांना सुद्धा खारट पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका जास्त असतो.
4 / 5
जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य बिघडतं. जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण असल्यास हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. याशिवाय जास्त खारट पदार्थ खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस्ट्र्रिटिस आणि मूळव्याध या सारख्या समस्या निर्माण होतात.
5 / 5
मर्यादेपेक्षा जास्त सोडियम खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे हाडांचे आरोग्य खराब होणे.