मर्यादेपेक्षा जास्त सोडियम खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे हाडांचे आरोग्य खराब होणे.
पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन मग त्याचं मिठात रूपांतर होतं वगैरे वगैरे असं काहीसं तुम्ही ऐकलं आहे का? समुद्र किनारी मिठागरे असतात. हेच ते सी सॉल्ट! सी सॉल्ट पटकन विरघळतं.
सेंधा मीठ म्हणजेच पिंक सॉल्ट. यात 84 प्रकारचे मिनरल्स आढळतात. हे मिनरल्स आरोग्यासाठी उत्तम असतात. सेंधा मीठ हे शरीरातील साखरेची पातळी, रक्तपेशींची पीएच पातळी सुधारते आणि स्नायूंच्या वेदना दूर करते.
मधुमेह असणाऱ्यांनी मिठाचं जास्त सेवन करू नये. इतकंच काय तर ज्यांना मधुमेह नाही त्यांना सुद्धा खारट पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका जास्त असतो.
आरोग्य तज्ञांच्या मते, मीठामध्ये कमी प्रमाणात सोडियम जास्त फायदेशीर असते. सी सॉल्ट आणि सेंधा मीठ दोन्ही मिठाचे प्रकार अधिक फायदेशीर आहेत. या दोन्हींमध्ये सामान्य मीठापेक्षा सोडियमचे प्रमाण कमी असते. आपण आपल्या जेवणात या दोन्ही मिठाचा समावेश करू शकता.