पुणे शहरात काय झाले, चक्क रस्ताच कसा खचला
पिंपरी-चिंचवड शहरामधील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डेच-खड्डे निर्माण झाले आहे. त्याचवेळी शहरातील एक रस्ताही खचला आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
1 / 5
पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता खचल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या रस्त्याजवळ इमारतीचे काम सुरु होते. त्यामुळे नेहमी या ठिकाणी कामगारांची गजबज असते.
2 / 5
पिंपळे सौंदगरमध्ये रस्ता खचण्याची घटना घडली आहे. या ठिकाणी एका इमारतीचे काम सुरु होते. त्याला लागून हा रस्ता आहे. आज गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे.
3 / 5
रस्ता खचण्याची घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटनाही घडली असती. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही फुटली आहे.
4 / 5
पिंपळे सौंदगरमधील हा रस्ता इमारतीच्या कामांमुळे खचली की रस्त्याचे काम निकृष्ट होते, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शहरातील रस्ते दुरुस्त झाले नसताना रस्ता खचण्याची घटना घडली आहे.
5 / 5