Marathi News Photo gallery What is boeing starliner future return to earth without sunita williams nasa next mission space project
Sunita Williams : Boeing Starliner च पुढे काय होणार? 33 हजार कोटी बुडणार का?
Boeing Starliner Future : सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आहेत. NASA ने स्टारलायनरला अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये किती पैसा लागला आहे? भविष्य काय असेल? अमेरिकेची योजना काय आहे? जाणून घ्या.
1 / 10
लॉन्चपासूनच अडचणींचा सामना करणारं बोईंगच स्टारलायनर स्पेसक्रफ्ट पृथ्वीवर परत आलं आहे. जून महिन्यात या यानातून सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले. ते अजूनही तिथेच आहेत.
2 / 10
थ्रस्टर्समधील बिघाड आणि हीलियम गॅस लीक सारख्या समस्यांमुळे नासाला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. म्हणून त्यांनी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेसएक्स क्रू 9 ड्रॅगन मिशनव्दारे परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 10
4 / 10
नासा आणि बोईंगमध्ये 2014 साली ही डील झाली होती. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याशिवाय स्टारलायनरच परत येणं हा बोईंगच्या स्पेस बिझनेससाठी मोठा धक्का आहे. पहिलं मानवी मिशन फसल्यानंतर स्टारलायनरच्या पुढच्या मिशनसाठी संकटाचे ढग जमा झाले आहेत.
5 / 10
अमेरिकेची सरकारी अवकाश संस्था नासाला पृथ्वीच खालचं ऑर्बिट स्पेस मिशनसाठी प्रायवेट सेक्टरकडे सोपवायचं आहे. म्हणून नासाने 2014 साली बोईंग आणि स्पेसएक्ससोबत करार केला होता. बोईंगला 4.2 अब्ज डॉलर म्हणजे 33 हजार कोटी रुपयाच कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. यात स्टारलायनर अवकाश यानाच्या निर्मितीचा सुद्धा समावेश होता.
6 / 10
दुसऱ्याबाजूला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीला 2.6 अब्ज डॉलर (जवळपास 21,800 कोटी रुपये) कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. स्पेसएक्सने आतापर्यंत अनेक मानवी अवकाश मोहिमा केल्या आहेत. बोईंगच्या स्टारलायनरच हे पहिलं मानवी मिशन होतं, ज्यात ते अपयशी ठरलेत.
7 / 10
स्टायरलायनर अंतराळवीरांशिवाय परतलं असलं तरी त्याने सेफ लँडिंग केली. म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर असते, तरी त्यांचं सुद्धा सेफ लँडिंग झालं असतं. पण नासाला कुठलाही धोका पत्कारायचा नव्हता.
8 / 10
या सगळ्या परिस्थितीनंतर अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, नासा बोईंगच्या स्टारलायनरला मानवी मिशनसाठी आणखी एक संधी देणार का? बोईंग छोटी कंपनी नाहीय. एयरोस्पेस इंजिनिअरींग सेक्टरमधील त्यांच्याकडे एक मोठा अनुभव आहे.
9 / 10
नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी स्टारलायनरच्या लँडींगनंतर पत्रकार परिषद घेतली. स्टारलायनरच्या पुढच्या फ्लाइटला स्टारलायनर-1 असं नाव देण्यात आलं आहे.
10 / 10
नासाने चार जणांच्या क्रू ला स्पेस स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना तिथून परत घेऊन येण्यासाठी परवानगी दिली, तर बोईंगच हे दुसरं ऑपरेशनल मिशन असेल. या मिशनला स्टारलायनर-1 नाव देण्यात आलय.