PHOTO | अद्भुत डोळेवाली महिला : बापरे..10 कोटी रंगांना सहजच ओळखू शकते ऑस्ट्रेलियातील ही महिला, जाणाल तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटेल !!
What is superhuman vision: ऑस्ट्रेलियात राहणारी कॉन्सेटा एंटिको या महिला आपल्या डोळ्यांनी 10 कोटी रंगाना ओळखू शकतात. कॉन्सेटा यांचे म्हणणे असे आहे की लहानपणापासून मला याचा परिणाम दिसू लागला होता. चला तर मग जाणून घेऊया या डोळ्यांमध्ये असे काय विशेष आहे, जे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांना दिसत नाही.
1 / 5
ऑस्ट्रेलिया येथे राहणारी महिला तिचे नाव आहे कॉन्सेटा एंटिको. यांचे डोळे खूपच विशेष आहे. या महिलेचे डोळे दहा कोटी रंगांना सहज ओळखू शकतात.कॉन्सेटा यांचे म्हणणे आहे की, लहानपणापासूनच मला या गोष्टींचा प्रभाव जाणवू लागला होता. मला प्रत्येक गोष्टीमधील वेगवेगळे ओरिजनल रंग दिसायचे आणि हे सगळे रंग मी माझ्या पेंटिंगमध्ये उतरवत असे परंतु मला हे माहिती नव्हते की माझे डोळे इतके विशेष आहे. ही संपूर्ण माहिती एका संशोधनानंतर प्राप्त झाली. जगामध्ये अशा प्रकारचे फक्त 1 टक्के लोक आहेत की ज्यांना वेगवेगळे रंग दिसतात.
2 / 5
बीबीसीच्या रिपोर्ट नुसार कॉन्सेटा यांचे डोळे टेट्राक्रोमेट आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांमध्ये तीन कोन (शंकु) असतात परंतू या व्यक्तींच्या डोळ्यामध्ये चार कोन असतात. सर्वसाधारणपणे एका कोनामध्ये दहा लाख पेक्षा अधिक रंग ओळखण्याची क्षमता असते. वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की, 4 कोनवाल्या टेट्राक्रोमेट डोळ्यांमध्ये 10 कोटी रंग ओळखण्याची शक्ती असते.
3 / 5
टेट्राक्रोमेट डोळे असल्या कारणामुळे कॉन्सेटाला प्रत्येक वस्तूमधील ओरिजनल रंग दिसतात. जे की सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यांना दिसत नाही.कॉन्सेटा याचे म्हणणे आहे की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या अमेरिकाच्या सैन डिएगो येथे आल्या. 2012 नंतर टेट्राक्रोमेट डोळ्यांशी निगडीत न्यूरोलॉजीच्या एका विद्यार्थ्याने यावर संशोधन केले. संशोधन केल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे समोर आले की अशा प्रकारचे डोळे असणाऱ्या महिलांच्या मुलींना कलर ब्लाइंडनेस होण्याचा धोका अधिक असतो.
4 / 5
जेव्हा संशोधनाचे निष्कर्ष समोर आले तेव्हा त्याच्या काही दिवसांपूर्वीच एंटिकोची मुलीला कलर ब्लाइंडनेस हा आजार झाला आहे हे कळाले. अशाप्रकारे त्यांना आपल्या डोळ्यात बद्दलची माहिती मिळाली. एंटिको आता ज्या व्यक्तींना कलर ब्लाइंडनेस चा झाला आहे. अशा व्यक्तींच्या मदतीसाठी ते कार्य करत आहे. जर एखाद्या रुग्णाला कलर ब्लाइंडनेसची लक्षणे व हा आजार लवकर कळला तर त्याच्यावर योग्य ते उपचार करुन काही प्रमाणत नियंत्रण मिळवता येते.
5 / 5
व्यक्तीमध्ये टेट्राकोमेट डोळे का असतात. या विधानावर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या किंबर्ले जेम्सन यांचे म्हणणे असे आहे की, 15 टक्के महिलांमध्ये अशा प्रकारचा जिन आपल्याला पाहायला मिळतो. जे अशा प्रकारच्या डोळ्यांसाठी सर्वस्वी जबाबदार असतात. अशा प्रकारची डोळे असणे हे फक्त आपल्याला प्रामुख्याने महिलांमध्ये पाहायला मिळते. कारण की हा जीन फक्त X क्रोमोझोमला प्रभावित करतो. जीनच्या म्युटेशन कारणामुळे चौथा कोन तयार होतो आणि असे झालेले फक्त 1 टक्के लोकांमध्येच पाहायला मिळते.