कर्ज घेताना काही कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. पण त्यापूर्वी बँका, वित्तीय संस्था तुम्हाचा सिबिल स्कोर तपासतात. सिबिल स्कोर अथवा सिबिल रँक हे शब्द अशावेळी कानावर येतात. काय आहे त्यात फरक, त्याचा अर्थ तरी काय?
CIBIL Score ही त्या व्यक्तीची क्रेडिट हेल्थ कशी आहे, त्याची माहिती देतो. त्यासाठी अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यात येते. तर दुसरीकडे CIBIL रँक, क्रेडिट रिपोर्ट (CCR) असतो.
सिबिल स्कोर हा वैयक्तिक अर्जदारासाठी असतो. सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. हा 300 ते 900 या अंकादरम्यान असतो. हा स्कोअर जितका अधिक, तितके चांगले असते.
तर सिबिल रँक हा कंपन्यासाठी आहे. सिबिल रँक 10 ते 1 या स्केलमध्ये देण्यात येतो. यामध्ये 1 ही टॉप रँक असते.
सिबिल स्कोर कोणत्याही व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री आधारावर दिल्या जातो. पण सिबिल रँक 50 कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट असणाऱ्या कंपन्यांसाठी उपलब्ध आहे.
सिबिल स्कोर वैयक्तिक अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री, रिपोर्ट आणि रेटिंग ठरवण्यात येते. तर CIBIL रँकसाठी कंपनीने मागे केलेली परतफेड आणि क्रेडिटचा वापर यावर ठरवल्या जाते. ही माहिती CIBIL अधिकृत साईटवरील माहिती आधारावर आहे.