ऐन दिवाळीत व्हॉट्सअप डाऊन झालय. त्यामुळे कोणाचा मेसेज येत नाहीय आणि मेसेज पाठवताही येत नाहीय.
व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर अनेकांनी नेमकं काय झालय? ते जाणून घेण्यासाठी टि्वटरकडे मोर्चा वळवलाय.
व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर टि्वटरवर गमतीशीर, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.
व्हॉट्सअपचे मेसेज जात नव्हते, तेव्हा अनेकांना आपल्या इंटरनेटमध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटलं, त्यासाठी इंटरनेट कनेक्शन तपासण्यात आलं.
पण काही वेळाने इंटरनेटमध्ये नाही, तर व्हॉट्सअपच डाऊन असल्याचं समजलं. त्यानंतर अनेकांनी फेसबुक, टि्वटर या सोशल प्लॅटफॉर्मकडे मोर्चा वळवला.