Marathi News Photo gallery When amrita singh opens up on comeback in films after divorce with saif ali khan said have to pay bills
मोडलं 12 वर्षांचं लग्न, सैफशी घटस्फोटानंतर जेव्हा कामावर परतली अमृता; म्हणाली “घर विकून तर..”
अमृताने तिच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. त्याचसोबत 12 वर्षांनी लहान सैफ अली खानसोबत लग्नामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत.
1 / 5
अभिनेत्री अमृता सिंहने अभिनेता सैफ अली खानशी 1991 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. अखेर 2004 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृता आणि सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत.
2 / 5
घटस्फोटानंतर अमृता तिच्या दोन्ही मुलांसोबत राहतेय. सारा आणि इब्राहिमचं संगोपन अमृतानेच केलं. 'झूम' वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
3 / 5
"मला त्या 12 वर्षांमध्ये अभिनय सोडल्याची काही खंत नाही. मला सैफशी लग्नाच्या बदल्यात बरंच काही मिळालं. घटस्फोटानंतर पुन्हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करणं माझ्यासाठी बऱ्यापैकी सोपं होतं. कारण फिल्म इंडस्ट्री याबाबतीत खूप सपोर्टिव्ह आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात मनमोकळेपणे जगली", असं अमृता म्हणाली.
4 / 5
मुलांविषयी अमृता पुढे म्हणाली, "मला माझ्या मुलांच्या मनात ही भावना आणू द्यायची नाही की त्यांचे पालक अपयशी ठरले. माझी मुलं लहान आहेत. मला त्यांचं संगोपन करायचं आहे. मला त्यांना हे समजवावं लागतं की त्यांच्या अम्माला कामावर जावं लागेल."
5 / 5
"सिंगल पॅरेंट असल्याच्या विचाराने मी कधी घाबरले नाही. जास्तीत जास्त काय होईल? फार पैसे कमावू शकले नाही तर मोठं घर विकून छोट्या घरात कुठेतरी राहायला जाऊ. त्यांना मी किमान दोन वेळचं जेवण तरी नक्कीच देऊ शकते", असं अमृता म्हणाली होती