‘बोल्ड आणि ग्लॅमरस मुली सोबत लग्न करा, कारण…’, सैफ अली खान याच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ
अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर सैफ आता अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. सैफ आणि करीना यांनी २०१२ साली एकमेकांसोबत लग्न केलं.
1 / 5
अभिनेता सैफ अली खान याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. अमृता आणि सैफ यांनी दोन मुलं देखील आहेत. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्याने बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रीसोबत लग्न केलं. दोघांच्या वयात १० वर्षांचं अतंर आहे.
2 / 5
लग्नानंतर अभिनेत्याने एक मुलाखतीत, 'बोल्ड आणि ग्लॅमरस मुली सोबत लग्न करा, कारण नंतर पश्चाताप व्हायला नको..' असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला होता.
3 / 5
सैफ म्हणाला होता की, ‘मी सर्व पुरुषांना एकच सल्ला देईल की, स्वतः पेक्षा लहान, सुंदर महिलांसोबत लग्न केलं पाहिजे…’ या वक्तव्यानंतर अभिनेता तुफान चर्चेत आला. करीना आणि सैफ यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहेत.
4 / 5
करीना आणि सैफ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर दोघांमधील प्रेम बहरलं. त्यानंतर अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
5 / 5
करीना कायम सोशल मीडियावर पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. करीना - सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमुर अली खान असं असून लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे.