Akshay Kumar : अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाच्या या कृतीने मुलांना आणली लाज
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमी चर्चेत असतात. अक्षय कुमार सध्या हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचेळी ट्विंकल खन्ना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत असते.
1 / 5
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाच्या एका कृतीने मुलांना लाज आणली. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी आहे. दोघे अनेकदा परस्पराचे फोटो शेयर करत असतात.
2 / 5
अक्षय कुमार आपल्या कामासोबत मुलांना सुद्धा वेळ देतो. ट्विंकल खन्ना सुद्धा मुलांना वेळ देते. ट्विंकल खन्नाने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर एक फॅमिली व्हिडिओ शेअर केलाय.
3 / 5
अक्षय आणि ट्विंकल आपल्या दोन मुलांसोबत दिसतायत. क्लिप पाहून हा त्यांच्या वेकेशनचा व्हिडिओ दिसतोय. अक्षय आणि ट्विंकल दोघेही कंबरेला लचके देत चालतायत. या कृतीने सोबत असलेल्या मुलांना लाज आणलीय.
4 / 5
जेव्हा तुम्ही डान्स करु शकता, तेव्हा पायी का चालायच? मुलांना लाजवण्याची संधी असं ट्विंकल खन्नाने म्हटलय.
5 / 5
पुढे ती पोस्टमध्ये म्हणते, जेव्हा मुलं किशोरवयात येतात, तेव्हा तुमच्या असण्यामुळेच त्यांना लाज वाटते.